मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने करीता शिवसेनेतर्फे कणकवलीत मदत कक्ष

कणकवली विधानसभेतील लाभार्थी महिलांचे फॉर्म देणार मोफत ऑनलाईन भरून

मतदार संघातील पात्र महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली या ठिकाणी मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या योजनेत करिता लाभार्थ्यांसाठी कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी 10 हजार अर्ज पाठवण्यात आले असून, प्रत्येक लाभार्थ्या महिलेचे अर्ज कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये भरून ऑनलाईन करून मोफत देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, विधानसभा प्रमुख संदेश पटेल व तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी हा मदत कक्ष कणकवली मध्यवर्ती कार्यालयामध्ये सुरू करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहितीसाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय प्रमुख विश्राम सावंत 7588459818 यांच्याशी संपर्क साधावा किंवा अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याच्या महिला तालुकाप्रमुख प्रिया टेमकर तसेच कणकवली देवगड व वैभववाडी तालुकाप्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!