कलमठ गावडेवाडी मध्ये पुराचे पाणी आल्याने तारांबळ

सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनी घेतली पूरग्रस्त ग्रामस्थांची भेट

रात्री उशिरा पुराचे पाणी ओसरले

रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कणकवली तालुक्यातील कलमठ गावडेवाडी भागामध्ये काही घरांमध्ये पाणी घुसले. घराच्या अंगणामध्ये गुडघ्याभर पाण्यामधूनच लोकांना रात्र भीती खाली काढावी लागली. घटनेची माहिती मिळतात सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, तेजस लोकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच लोकांना धीर देत काही मदत लागली तर हक्काने सांगा अशी ग्वाही देखील सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिली. यावेळी महसूल विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार मंगेश यादव, मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील, तलाठी सुवर्णा कडूलकर यांनी देखील कलमठ मध्ये भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या रात्रीच्या वेळी देखील भर पुराच्या पाण्यातून चालत संदीप मेस्त्री व स्वप्नील चिंदरकर यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेत त्यांना धीर दिला. तसेच आवश्यकता भासल्यास स्थलांतर करण्याबाबतही नियोजन करण्यात आले होते. मात्र रात्री 11 वा. दरम्यान पावसाचा जोर ओसरल्याने पुराच्या पाण्याची पातळी कमी झाली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

error: Content is protected !!