नियोजनबद्ध कालावधीत कणकवलीतील महामार्ग ची कामे पूर्ण झालीच पाहिजेत

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हायवे ठेकेदार कंपनीला सूचना
शहरातील दुरावस्था झालेल्या सर्विस रस्त्यांचे डांबरीकारणाने पॅचवर्क
कणकवली शहरातील हायवेच्या सर्विस रस्त्याच्या पॅकवरचे काम हे दर्जेदार रित्या पूर्ण करा. तसेच शहरात सर्विस रस्त्याला ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही त्या ठिकाणी महामार्ग प्राधिकरनच्या अखत्यारीतील स्ट्रीट लाईट तातडीने लावा. तसेच महामार्ग क्रॉस करणारे नाले हे साफ करून त्यांचे त्यांच्यातील ड्रेनेज व्यवस्थित जाईल अशी व्यवस्था करा. कणकवली शहरातील महामार्गाची कामे दर्जेदार रित्याच पूर्ण झाली पाहिजेत. त्यात तडजोड खपवून घेतली जाणार नाही. याकरता नगरपंचायतीचे सहकार्य लागल्यास ते देण्यास आम्ही तयार आहोत. परंतु ठराविक कालावधीमध्ये ही कामे पूर्ण झाली पाहिजेत. अशा सूचना कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिल्या. कणकवली शहरातील सर्विस रस्त्यांच्या डांबरीकरणाने पॅचवर्क चे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. गेले काही दिवस याबाबतची मागणी श्री पारकर यांनी महामार्ग प्राधिकरण कडे केली होती. अखेर शहरातील दुरावस्था झालेल्या सर्विस रस्त्यांचे डांबरीकरण झाल्याने जनतेमधून देखील समाधान व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान हे काम सुरू असताना दिलीप बिल्डकॉन च्या अधिकाऱ्यांची ही पारकर यांनी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. शहरातील हवेच्या अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत. शहरातील जनतेला त्रास होता नये. या दृष्टीने आपण ही कामे कालावधीमध्ये मार्गी लावली पाहिजेत. केवळ मलमपट्टीचे काम होता नये .डांबरीकरणाचे जवळपास साडेतीन किलोमीटर दुतर्फा सर्विस रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा. तसेच सर्विस रस्त्याला ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही तिथे पोल नव्याने उभारून शहरातील जनतेला स्ट्रीट लाईट ची सुविधा द्या. याकरता अडचण भासल्यास नगराध्यक्ष म्हणून मला सांगा. नगरपंचायत तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल. अशी ग्वाही देखील पारकर यांनी दिली. गोकुळधाम कडील नाला, हॉटेल निखिल कडील नाला ह्या नाल्यांमधून पावसाळ्यात मोठे पाणी जात असल्याने पाणी साचण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे हे नाले हायवेने आपल्या हद्दीतील सफाई पूर्ण करून क्लियर करून द्यावेत अशा देखील सूचना श्री पारकर यांनी दिल्या. कणकवली शहरातील सर्विस रस्त्यांच्या झालेल्या डांबरीकरणाबद्दल शहरवासीयांमधून देखील समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत गौरव हर्णे, सोहम वाळके, नाना सापळे बाबू केनी आणि उपस्थित होते.





