राज्य अजिंक्यपद निवड चाचणीसाठी राज्य पंच म्हणून अमित गंगावणे यांची निवड

अमित गंगावणे यांचे सर्वच स्तरातून होतेय कौतुक
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने 71 वी वरिष्ठ पुरुष गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी 2024 पुणे येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य पंच श्री.अमित गंगावणे यांची पंचपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गंगावणे हे महसूल विभागात कार्यरत असून, त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.