मुंगूस या प्राण्याला वाचविताना भरधाव दुचाकीचा अपघात

दुचाकीस्वार गंभीर, ओरोस रुग्णालयात हलविले,ओरोस जिजामाता चौक नजीक अपघात!….

रस्त्याच्या मधोमध आलेल्या मुंगसाला वाचवताना अपघात झाला. यात तो दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जिजामाता चौक परिसरात घडली. संबंधित जखमीचे नाव समजू शकले नाहीत. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कणकवली रेल्वे स्टेशन येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने पाहिला. त्यानंतर त्यांनी याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलिसांना माहिती दिली, अशी माहिती प्रभारी अधिकारी मनीष कोल्हटकर यांनी दिली.

error: Content is protected !!