खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांचा भाजपा प्रवेश हा वैयक्तिक स्वार्थासाठी
शिवसेना कणकवली उपतालूका प्रमुख मंगेश गुरव यांची टीका
कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावच्या शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी नुकताच लोकसभेच्या निवडणूकीचे निकाल जाहीर होताच दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टी पक्षात भजपा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित कणकवली येथे त्यांच्या ओम गणेश निवास्थानी जाहीर प्रवेश केला. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना कणकवली उपतालुका श्री मंगेश गुरव यांनी खारेपाटण शिवसेना पक्ष कार्यालयात तातडीची पत्रकार परिषद घेऊन प्रसिध्दी पत्राद्वारे आपली भूमिका मांडली.
याबाबत दिलेल्या लेखी पत्रात म्हंटले आहे की, खारेपाटण सरपंच सौ प्राची देवानंद ईसवलकर यांचा अचानकपणे भाजप पक्षात झालेला प्रवेश हा त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी झालेला असून पैशाच्या आमिषाने त्यांनी भाजप पक्षात पक्षांतर केले असल्याची तिखिट प्रतिक्रिया शिवसेना उपतालूका प्रमुख मंगेश गुरव यांनी दिली.
तसेच ते पुढे म्हणाले की, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सरपंचाचा भाजप मध्ये प्रवेश करून घेणे म्हणजे खारेपाटण ग्रामस्थांचा विश्वासघात केल्यासारखे आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या भाजपा उमेदवाराचा दारुण पराभव करीत शिंदे गट शिवसेनेने खारेपाटण सरपंच आपल्या मेहनतीने निवडून आणला होता.त्याचे शल्य स्थानिक आमदार व विभागातील कार्यकर्त्यांना होते. त्यामुळे खारेपाटण मधील विकास कामांचे प्रस्ताव जाणीवपूर्वक अडविले जात होते.इतकेच काय तर गेली अनेक वर्षे सुरू असलेला खारेपाटण तालुक्याचा प्रस्ताव ही मंत्रालय स्तरावर भाजप ने अडवून ठेवल्याची माहिती तालुका समितीकडे आहे.
अशा प्रकारे खारेपाटण ला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या भजपा पक्षात प्रवेश करताना खारेपाटण सरपंच ईसवलकर यानी विकासासाठी पक्षांतर केले असे म्हणणे हास्यास्पद आहे.तर स्वतःचा आर्थिक फायदा व कुटुंबियांच्या विकासासाठी केलेले हा प्रवेश असल्याने एकप्रकारे तमाम खारेपाटण वासितांच्या भावनेला तडा देणे व ग्रामस्थांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खूपसण्यारखे आहे. असे श्री मंगेश गुरव यांनी सांगितले.
गेली १५ वर्षे भाजप दबावाचे राजकारण करीत सतत खारेपाटण सरपंच या भाजप पक्षात प्रवेश करणार अशा वावड्या सारख्या उठविण्यात येत होत्या.आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी लोकसभेला महायुतीचे प्रामाणिक पणे काम केले तरी देखील बुधवारी खारेपाटण सरपंच ईसवलकर यांचा भाजप पक्षाने प्रवेश करून घेऊन एकप्रकारे शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.आल्याचे सांगितले श्री गुरव यांनी सांगितले.
” परंतु भाजपाच्या सर्व स्थानिक पदाधिकारी नेत्यांना आव्हान आहे की,जर तुमच्यात हिम्मत असेल तर सरपंचांनी राजीनामा देत पुन्हा निवडून येऊन दाखवावे. असे आव्हान कणकवली शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी भाजप पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून केले आहे.तर याबाबत शिवसेना नेते व मार्गदर्शक श्री भैया सामंत व जिल्हा प्रमुख श्री संजय आंग्रे यांच्याशी चर्चा करून पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याचे शिवसेना प्रवक्ता व कणकवली उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना शिंदे गटाचे खारेपाटण मधील कार्यकर्ते व ग्रा.पं.सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे,सुधाकर ढेकणे,सौ. अस्ताली पवार,मंगेश ब्रम्हदंडे,सुहास राऊत आदी उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे,खारेपाटण