जानवलीत मिडलकट मुळे पुन्हा एकदा महामार्गावर अपघातात एक गंभीर
दुचाकीला बसली कारची धडक
वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल
मिडल कट वरून वळत असताना दुचाकीची कारची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले. यातील दुचाकी वरील एकाचा पाय फॅक्चर झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी कणकवली दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास जानवली हॉटेल नीलम कंट्रीसाईड जवळील मिडलकट जवळ घडला. अपघातानंतर वाहतूक पोलीस राजेश पाटील यांच्यासह नागरिकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेमार्फत जखमी दुचाकी स्वराला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. जानवली मध्ये एकाच गावामध्ये तब्बल 9 अनधिकृत मिडल कट असून या मिडल कटमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. मात्र याबाबत कोणत्याही ठोस उपाययोजना होत नसल्याने हे वारंवार मिडल कट अपघातास कारण ठरत आहेत. गोव्याच्या दिशेने मिडल कट मधून वळत असताना दुचाकीची या कारला धडक बसली. या मिडलकट मधून कार गोव्याच्या दिशेने वळत होती. मात्र दुचाकी स्वराला दुचाकीवर नियंत्रण ठेवता न आल्याने त्याची कारच्या साईटला जोरदार धडक बसली. या मिडल कट मुळे यापूर्वी देखील येथे अनेकदा अपघात झाले आहेत..
दिगंबर वालावलकर/ कणकवली