ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा…
कणकवली/मयुर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात पार पडला.
छत्रपती शिवरायांचे कार्य हे महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
आयडीयल इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रशालेचां विद्यार्थी वेदांशू कदम( 10 वी अ ) व विद्यार्थिनी अंतरा गुडेकर (10 वी ब) यांनी शिवरायांचे विचार भाषणातून मांडले.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.