रुपेश पावसकर यांनी घेतली नेरूर-गोंधयाळेवाडी ग्रामसंस्थांची भेट…
टोक्यांच्या त्रासापासून तोडगा काढण्यासाठी लवरच तोडगा निघेल…
ग्रामस्थांना दिली ग्वाही; पुरवठा अधिकाऱ्यांशी केली चर्चा…
शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी बुधवारी नेरुर गोंधयाळे येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कार्यालयाबाहेर उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांची भेट घेतली. शासन लवकरात लवकर तोडगा काढून ग्रामस्थांना न्याय देईल अशी ग्वाही श्री. पावसकर यांनी यावेळी दिली. टोक्यांच्या त्रासामुळे त्रस्त नेरुर गोंधयाळेवाडी ग्रामस्थ बुधवारी एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामासमोर उपोषणाला बसले होते. या उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांची भेट घेऊन शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी त्याच्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्येचे निवारण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी ग्रामस्थांना दिली. रुपेश पावसकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर, राज्याचे उद्योमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष तथा सिंधुरत्न समिती संचालक. किरण उर्फ भैय्या सामंत यांचे याविषयी लक्ष वेधले. या सर्व नेत्यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता, यावर शासन लवकरात लवकर तोडगा ग्रामस्थांना न्याय देईल अशी ग्वाही यावेळी व्यक्त केली. तसेच शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करुन ग्रामस्थांना न्याय देण्याची मागणी केली. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.