कणकवली शहर मोठे मताधिक्य देत राणेंच्या पाठीशी ठाम राहिले!

कणकवली शहरातून नारायण राणे यांना 1 हजात 717 चे मताधिक्य
विरोधी पक्ष आव्हान स्वीकारू शकले नाहीत यातच त्यांची क्षमता दिसली
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा टोला
कणकवली शहरातून केंद्रीय मंत्री व विद्यमान नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांना लीड मिळवून देणार हिम्मत असेल तर विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हे आव्हान स्वीकारावे असे आव्हान काही दिवसांपूर्वीच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिले होते. व समीर नलावडे यांनी दिलेल्या आव्हानाप्रमाणेच कणकवली शहरातून महायुतीचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांना 1 हजार 717 मतांची मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे कणकवली शहर हे नारायण राणे यांच्यासोबत ठाम राहिल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केली. कणकवली शहर हे राणेंच्या व पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी यापूर्वीपासून होते. शहरातून राणेंना मताधिक्य मिळवून देण्याचे जाहीर केल्यानंतर हे आव्हान स्वीकारण्यासाठी महायुती मधील कुणीही पुढे आले नव्हते. कारण महायुती मधील कार्यकर्ते व पदाधिकारी या क्षमतेचे आता उरले नाहीत असा चिमटा देखील श्री. नलावडे यांनी काढला. राणेंना शहरातून लीड देण्या बाबतचे आव्हान न स्वीकारल्याने विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची व त्यांच्या पदाधिकाऱ्यांची क्षमता दिसून आली होती. मात्र कणकवली शहरातून जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहत नारायण राणे यांना मोठे मताधिक्य दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली हे सर्वात जास्त मताधिक्य देणारे शहर ठरले असल्याचेही श्री. नलावडे यांनी सांगितले. त्यामुळे कणकवली शहरातील जनता ही राणेंसोबत आहे. विरोधी पक्षातील लोकांकडून केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे वारंवार काम केले जाते. मात्र जनता अशा दिशाभूलीला बळी पडत नाही हे जनतेने व मतदारांनी निकालातून दाखवून दिल्याचेही श्री. नलावडे म्हणाले. तसेच विरोधी पक्षातील लोकांना ही एक चपराक असून यापुढे त्यांनी गरज असल्यास आत्मचिंतन करावे असा टोला देखील नलावडे यांनी लगावला.
दिगंबर वालावलकर /कणकवली