राणेंचा विजय म्हणजे कोकणच्या जनतेचा विजय – विशाल परब

कोकणचे सुपुत्र व कोकणच्या विकासासाठी नेहमी गेली ४० वर्ष झटणारे आमचे सवचि मार्गदर्शक, प्रेरणास्थान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा विजय हा कोकणच्या जनतेचा विजय आहे. येथील जनतेने राणे यांच्या पाठिशी राहून आम्ही विकासाला साथ देतो हे दाखवून दिले आहे. राणेंचा विजय हा आजच्या तरुणांना निश्चितच एक वेगळी प्रेरणा देणार आहे, असे मत भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केले. परब पुढे म्हणाले, या विजयाने आम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्त यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. राणे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली तेव्हाच राणे यांचा विजय होणार हे निश्चित होते. आज ते वास्तव्यात पाहायला मिळाले आहे. आता खऱ्याअर्थाने कोकणचा विकासाचा चेहरामोहरा बदलेल, असा विकास आता निश्चित घडणार आहे, असेही परब म्हणाले. परब पुढे म्हणाले, सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा कार्यकत्यानी राणे यांच्या विजयाचा आनंद उत्सवासारखा साजरा केला. सर्व गावागावात राणे यांच्या विजयाचा आनंद साजरा होत आहे. खऱ्याअर्थाने आज कोकणात व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दिवाळी साजरी होत आहे. येथील तरुणांना रोजगार, नोकरी, शिक्षणाची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था उत्तम व्हायला हवी. हे कार्य राणेच करू शकतात. याची जाणीव येथील तरुणाईला झाली. त्यामुळेच तरुणाईने उत्तम साथ दिल्यामुळे महायुतीचे उमेदवार राणे चांगल्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. सिंधुदुर्ग- रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उत्तम साथ दिली. विशेषतः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सर्व पदाधिकारी, कार्यकत्यानी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचा फळ ३७ हजार मताधिक्य मिळवून देण्यात आले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार आदी सर्व नेते मंडळी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महायुतीचे सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते या सवच्या मेहनतीचे हे फळ आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी निश्चितच स्थान मिळणार आहे. येथील नोकरी, रोजगाराचा प्रश्न निश्चितच राणे सोडवतील, असा विश्वास तरुणांना आहे. या तरुणांची अपेक्षा राणे निश्चितच पूर्ण करतील, असा विश्वास मला आहे,

error: Content is protected !!