सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार खारेपाटण येथे नारायण राणे यांचे करण्यात आले जल्लोषी स्वागत…

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे विजयी झालेले खासदार नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेक पोस्ट येथे सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने तसेच महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजी जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य राणे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नामदार नारायण राणे यांच्या सोबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण,माजी खासदार नीलेश राणे,आमदार प्रमोद जठार,आमदार नितेश राणे,माजी आमदार राजन तेली,सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत,संतोष कानडे,रवींद्र जठार, दिलीप तळेकर,जयेंद्र रावराणे,मनोज रावराणे,रवींद्र शेट्ये प्रकाश पारकर, रवी पाळेकर,दिगंबर मांजरेकर,बंड्या मांजरेकर,राजन चिके तुळशिदास रावराणे,भाई नर,अशोक पाटील, पप्पू ब्रम्हदंडे,नाना शेट्ये,सौ तृप्ती माळवदे, खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव,रमाकांत राऊत,उज्वला चिके,रफिक नाईक, सुधीर कुबल, सूर्यकांत भालेकर,भाऊ राणे, मंगेश गुरव,आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांच्या विजयी मिरवणुकीच्या तथा रॅलीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेकपोस्ट येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नामदार नारायण राणे यांचे खारेपाटण येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेत आगमन होताच कार्यकर्त्यांनी गराडा घातला.व “नारायणराव राणे साहेब आगे बढो,हम तुम्हारे साथ है ! अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाच्या वतीने नारायण राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन व पुष्पहार घालून स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

अस्मिता गिडाळे,खारेपाटण

error: Content is protected !!