काही वेळातच कणकवलीत नारायण राणेंचे भव्य दिव्य स्वागत होणार!

डीजे, ढोल पथकासह भाजपा कार्यकर्ते राणेंच्या स्वागतासाठी सज्ज

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे आज विजयी झालेले खासदार नारायण राणे हे काही वेळातच कणकवली दाखल होत असून, राणेंच्या स्वागतासाठी कणकवली श्रीधर नाईक येथील चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. श्रीधर नाईक चौकातून राणेंची विजयी रॅली पटवर्धन चौकात दाखल झाली असून पटवर्धन चौक या ठिकाणी राणे यांचे स्वागत केले जाणार आहे. डीजे व लेझर लाईट या सहीत ढोल पथक देखील या ठिकाणी दाखल झाले असून राणेंचे भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी केले जाणार आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले असून, श्रीधर नाईक चौक ते बाजारपेठ मार्गे कणकवली पटकी देवी मंदिरापर्यंत ही विजयी यात्रा काढली जाणार आहे. आज दिवसभर रत्नागिरीत असून देखील भाजपा कार्यकर्त्यांचा तोच उत्साह व तोच जल्लोष कणकवलीत पाहायला मिळत आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!