पोईप हायस्कूलचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 100%लागला आहे

खुशी जितेंद्र परब हि पोईप केंद्रात 93.60. टक्के प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकावला आहे

मालवण तालुक्यातील पोईप येथील सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरण या प्रशालेचा . शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च /एफिल 2024 या प्रशालेचा एस.एस.सी परिक्षेचा निकाल 100% लागला असुन या परिक्षेसाठी 45विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्वच्या सर्व 45 विद्यार्थी उत्तीर्ण होत प्रशालेचा निकाल 100% लागला आहे

यामध्ये
प्रथम क्रमांक खुशी जितेंद्र परब हिला 468 गुण प्राप्त 93.60 टक्के, द्वितीय क्रमांक विना राजन खोत 464 गुण 92.80टक्के, तृतीय क्रमांक मानसी रविंद्र घाडीगावकर 449 गुण 89.80 टक्के
तर या शालांत प्रमाणपत्र मार्च 2024ला या प्रशालेतुन 45 नियमित विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 25 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य,13 विद्यार्थी प्रथम श्रेणी तर उर्वरित 7 विद्यार्थी व्दितीय श्रेणी प्राप्त केली आहे

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री अनिल कांदळकर ,सचिव श्री विलास माधव ,उपाध्यक्ष श्री गोपीनाथ पालव ,सर्व विद्यमान संचालक, मुख्याध्यापक श्री कुंभार सर ,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , पंचक्रोशीतील सर्व पालक यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

error: Content is protected !!