न्यू इंग्लिश स्कूल आचराचा निकाल १०० टक्के.

धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित माध्यमिक शालांत परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचराने घवघवीत यश संपादन करत १००टक्के निकाल लागला आहे. तर ९०टक्केच्या वर चार मुलांनी गुण मिळवीत शाळेचा लौकिक वाढवला आहे.
या प्रशालेतून एकूण ७२ विद्यार्थी परीक्षेत बसले होते ते सर्वजण उत्तीर्ण झाले असून १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये विशेष नाविन्यपूर्ण यश मिळविलेले विद्यार्थी
प्रथम क्रमांक स्वराली मारुती आचरेकर हिने९७.२०टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक इशा सचिन रिसबूड ९६टक्के गुण मिळवले तर
तृतीय क्रमांक राकेश चंद्रकांत देसाई ९५.६०टक्केचतुर्थ खुशी संदिप पालव ९१टक्केगुण मिळविले.. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब- मिराशी, सचिव अशोक पाडावे, स्थानिक स्कूल कमेटीच्या निलिमा सावंत,राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर, बाबाजी भिसळे, रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी पालक यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!