विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशा साठीचे दाखले वेळेत द्या !

कुडाळ मनसेची तहसीलदारांकडे मागणी

सेतु सुविधा सुलभ होण्याकरिता कुडाळ मनसे आग्रही

प्रतिनिधी | कुडाळ : दहावी बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया घेण्यासाठी लागणारे विविध दाखले विद्यार्थ्यांना वेळेत उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी कुडाळ तालुका मनसे यांनी केली आहे. त्या आशयाचे निवेदन त्यांनी आज कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांना दिले.
शैक्षणिक प्रवेशासाठी विविध प्रकारचे दाखले उदा.जातीचे दाखले, नॉन क्रिमिनल, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व याप्रकारे अनेक दाखले मिळविण्यासाठी कुडाळ तालुक्याच्या ग्रामीण दुर्गम भागातून अनेक मुले व पालक हे येत असतात. अशावेळी बरेचदा तहसील कार्यालय इंटरनेट किंवा सर्वर डाऊन अशा प्रकारच्या कारणांसोबत सेतू केंद्रातून अरेरावीची उत्तरे देण्यात येतात. अशावेळी पालक व मुलांना होणारा त्रास कमी होण्यासाठी व शैक्षणिक दाखले वेळेत व सुलभतेने मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका अध्यक्ष हेमंत जाधव व तालुका अध्यक्ष गजानन राऊळ यांनी निवेदन दिले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, जगन्नाथ गावडे, विष्णू मस्के, दिपक गंगावणे, अतुल पांगुळ, सोहम कुंभार उपस्थित होते.
मनसेने केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांनी आजच सेतू सुविधा केंद्र चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देऊन जनसामान्यांना होणारा त्रास कमी करण्याचे आश्वासन दिले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!