शेठ न. म विद्यालय खारेपाटण दहावी चा निकाल १००%

ऋतुजा करंदीकर ९३.६० टक्के प्राप्त करून विद्यालयात प्रथम
साची पारकर ९३.४०% मिळवून द्वितीय
एस.एस.सी .बोर्ड परीक्षेचा निकाल आज २७मे २०२४ रोजी लागला असून या परीक्षेत खारेपाटण येथील खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न. म विद्यालय चा निकाल हा १००% लागला आहे.या परीक्षेसाठी खारेपाटण विद्यालयातील ८३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी सर्वच्या सर्व ८३ विद्यार्थी हे उत्तीर्ण होऊन खारेपाटण विद्यालयाचा निकाल हा १००% लागला आहे.यामधे ऋतुजा मनोज करंदीकर हिने ४६८ गुण मिळवून ९३.६०% प्राप्त केले व विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. द्वितीय क्रमांक साची सचिन पारकर हिने ४६७ गुण मिळवून ९३.४०% प्राप्त केले आहेत.तर तृतीय क्रमांक दुर्वेश प्रकाश नानिवडेकर याने ४५४ गुण मिळवून ९०.८०% प्राप्त केले आहेत. या तिन्ही विद्यार्थ्याचे व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे सचिव श्री महेश कोळसुलकर खारेपाटण विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सानप सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक आणि पालकांचे विशेष अभिनंदन केले आहे.