ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी चा दहावीचा निकाल १००टक्के

ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी हायस्कूलचे इयत्ता दहावी परीक्षेला बसलेले सर्वच्या सर्व ११ विद्यार्थी पास होत शाळेचा निकाल शंभर टक्के लागला.प्रशालेतून युवराज रमेश साळकर याने ८३टक्के गुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळविला.मंथन उदययचंद्र नाईक ८२.२० गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला.तर वैष्णवी पांडूरंग सावंत ८०.४०टक्के गुण मिळवून तृतीय आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाघालक, मुख्याध्यापक शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.