नांदगाव मधील विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला अद्याप अटक का नाही?

नांदगाव पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामस्थांचा पोलीस निरीक्षकांना सवाल

चार दिवसात आरोपीवर कारवाई न झाल्यास पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार

लव जिहादच्या दृष्टीने देखील चौकशी करा!

कणकवली तालुक्यातील नांदगाव परिसरातील एका युवतीने 15 में रोजी विनयभंग झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपी मुराद हमीद साटविलकर (रा.नांदगाव) याला अद्याप अटक करण्यात आली नसल्याने संतप्त झालेल्या नांदगाव पंचक्रोशीतील सरपंच व ग्रामस्थांनी आज कणकवली पोलीस स्टेशन वर धडक देत पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांना जाब विचारला. संशयित युवक कुटुंबीयांना धमकी देत असून या पीडित युवतीवर जर जीवघेणा हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण? संशयित आरोपी ला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय पायबंद केला? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. यासंदर्भात तुमची तक्रार दाखल करून घेतली असून गुन्हा दाखल आहे. अजून काही यासंदर्भातील तक्रार असली तर ती ही दाखल करून घेऊन चौकशी करून कारवाई करू. असे आश्वासन पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांनी दिले. मात्र कायदेशीर बाबी पडताळून अटकेची कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. याबाबत पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे, सदर संशयित आरोपी असलेल्या युवकाने पीडीत युवतीला विवाह करायचा तगादा लावला होता. त्या युवतीने अखेर त्रासाला कंटाळून कणकवली पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी विरोधाल भादवी कलम ३५४,३५४ ड,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेला जवळपास 15 दिवस होत आले तरी अ‌द्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच यापूर्वी ही असे बरेच प्रकार घडले आहेत त्यावरही कठोर कारवाई झालेली नाही. त्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती सदर युवती असल्याने तिचे कुटुंबीय भीतीच्या दडपणाखाली आहे. भविष्यात पुन्हा याच मुलीवर हल्ला झाला तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सदर युवक सातत्याने धमकी देत असून पोलीस मात्र सुशेगात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. कठोर कारवाई होत नसल्यानेच असे प्रकार वारंवार घडल आहेत. तेव्हा हे प्रकार त्वरित थांबविण्यासाठी कठोरपणे कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे. जर येल्या 4 दिवसांत संबंधितावर कारवाई न झाल्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा देखील इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. याप्रसंगी नांदगाव सरपंच भाई मोरोजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डांमरे, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, सोसायटी चेअरमन भगवान लोके, माजी सभापती दिलीप तळेकर, सदडेकर यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. सदरचा प्रकार लव जिहाद या यामधील आहे का? याची देखील चौकशीची मागणी केली जात आहे.

error: Content is protected !!