युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या माध्यमातून साकेडीतील नैसर्गिक आपत्तीग्रस्त रामचंद्र घाडी यांना सिमेंट पत्रे प्रदान

चक्रीवादळामुळे घराच्या पडवीचे व गोठ्याचे झाले होते नुकसान
विभागप्रमुख किरण वर्दम, शाखाप्रमुख संदीप राणे यांच्या हस्ते पत्रे प्रदान
श्री घाडी यांनी व्यक्त केले सुशांत नाईक यांचे आभार
नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामध्ये कणकवली तालुक्यातील साकेडी फौजदारवाडी येथील रामचंद्र घाडी यांचा गोठा व घराच्या पडवीच्या पत्र्यावर झाड पडून मोठे नुकसान झाले होते. पावसाच्या तोंडावर झालेल्या नुकसानीमुळे श्री. घाडी हे हवालदील झाले होते. याबाबत युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी श्री. घाडी यांना स्वखर्चातून सिमेंट पत्रे दिले. युवा सेना विभागप्रमुख किरण वर्दम व शाखाप्रमुख संदीप राणे यांच्या हस्ते हे पत्रे श्री. घाडी यांना प्रदान करण्यात आले. नैसर्गिक आपत्ती काळातही शिवसेना ठाकरे गट आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावून गेल्याने साकेडी ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच श्री घाडी यांनी देखील मदत केलेल्या युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व त्यांच्या साकेडी मधील पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी मुरारी राणे, नामदेव सावंत, सागर मेस्त्री, सुनील घाडी, कृष्णा तेली यांच्यासह अन्य ग्रामस्थ देखील उपस्थित होते.