दक्षिण कुरंगवणे विकास मंडळ खैराटवाडी”च्या वतीने श्री. विठुमहाकाली मंदिराचा २९ वा वर्धापन दीन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

“दक्षिण कुरंगवणे विकास मंडळ खैराटवाडी” च्या वतीने श्री. विठुमहाकाली मंदिराचा २९ वा वर्धापन दीन सोहळा शुक्रवार दिनांक १७/०५/२०२४ रोजी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला, सकाळी देवीचा अभिषेक, त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद, सायंकाळी श्री. पांडुरंग म्हा. गोठणकर व श्री. तानाजी कुडाळकर यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी आणि पुरुषांसाठी फनी गेम्स, त्यानंतर पालखी मिरवणूक, स्थानिक भजन व रात्री १०.०० वाजता उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि छोटेखानी बक्षीस समारंभ मंडळाचे अध्यक्ष श्री. महावीर गोसावी, सचिव श्री. आकाराम रायकर, खजिनदार श्री. विश्वनाथ कदम, मंदिरासाठी विनामूल्य जमीन देणारे जमीनदार गोठणकर बंधुपैकी शिवाजी गोठणकर, मंडळाचे जेष्ठ सल्लागार श्री. काशीराम गोठणकर व श्री. सुरेश भितम यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्री. दिपक पाष्टे यांनी सूत्र संचालनाची जबाबदारी चोख पार पडली, रात्री ठीक ११.०० वाजता चालू झालेले ” नवयुग सेवा नमन मंडळ आसगे (टोळेवाडी) यांचे “बहुरंगी नमन” या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी खैराटवाडी विभागातील मंडळाच्या सर्व लहानथोर कार्यकर्त्यांनी तसेच महिला वर्गाने देखील मोलाचं सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम शेकडो देवीभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला…….!