खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचा १०० % निकाल….

विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु.फिझा मुल्ला ८६.६७ % गुण मिळवून कॉलेज मध्ये प्रथम
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित कै.प्रभाकर लक्ष्मण पाटील आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज खारेपाटण या कॉलेज सन २०२४ चा इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षा निकाल १०० % एवढा लागला असून द्वीस्तरीय व्यवसाय अभ्यासक्रममाचा उच्च माध्यमिक विभागाचा निकाल ९५% एवढा लागला आहे.तर विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. फीझा इरफान मुल्ला हिने ६०० पैकी ५२० गुण प्राप्त करत ८६. ६७ % एवढे मार्क मिळवून कॉलेज मध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत असून खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे सचिव श्री महेश कोळसुलकर खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय सानप सर यांनी तिचे व सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक आणि पालकांचे विशेष अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक १२ वी बोर्ड परीक्षा शैशणिक वर्ष सन – २०२४ चा अंतिम निकाल आज जाहीर झाला असून कोकण बोर्ड प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी राज्यात गुणवत्तेत प्रथम राहिला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण ज्युनियर कॉलेज ने देखील आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.तर संपूर्ण खारेपाटण कॉलेज मध्ये प्रथम – कु.फिझा इरफान मुल्ला (गुण – ८६.६७%), द्वितीय – कु. प्रियदा महेंद्र गुरव (गुण – ८५%) तृतीय – धनश्री शंकर शेट्ये (गुण – ८१.१७%)यांनी यश संपादन केले आहे.तर शाखा निहाय सविस्तर निकाल पुढील निकाल पुढील प्रमाणे —-
कला शाखा प्रथम – कु.प्रियदा महेंद्र गुरव (गुण – ८५%),द्वितीय – कु.
ऋणाली संतोष जुवाटकर (गुण – ७८.८३ %),तृतीय – कु.अस्मिता संजय कदम (गुण – ६५.५०%)
वाणिज्य शाखा – प्रथम – गिरीश
लक्ष्मण इंगळे (गुण – ७९.००%), द्वितीय – गौरव नामदेव कुडाळकर (गुण – ७७.३३%,),तृतीय – ओमकार रत्नु कुळये (गुण – ७६.८३%)
विज्ञान शाखा – प्रथम – कु.फिझा इरफान मुल्ला (गुण – ८६.६७%) , द्वितीय – कु.धनश्री शंकर शेट्ये (गुण — ८१.१७ %) तृतीय – कु.दीक्षा राजेंद्र चीके (गुण – ७६.८३%) तसेच तात्यासाहेब मुसळे तांत्रिक ज्युनिअर द्वीस्तरिय उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल पुढील प्रमाणे —
इलेक्ट्रॉनिक विभाग प्रथम – ओंकार सुनील दिवेकर (गुण – ७६.६७ %),
ऑटो इंजि.विभाग प्रथम – संदेश मंगेश कुडकर (गुण-७९.१७ %),
अकाऊंटन्सी विभाग प्रथम – कु.प्राची
गणपत घाडी (गुण – ७५.६७%)
खारेपाटण ज्युनिअर कॉलेज मधून १२ वी बोर्ड परिक्षेकरीता एकूण१७६ विद्यार्थी बसले होते.सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.व १०० टक्के रिझल्ट लागला. तर द्विस्तरिय व्यवसाय अभ्यासक्रम विभागात एकूण ६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९५ टक्के निकाल लागला आहे.परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्याने खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.