कुडाळात बिल्डर कडून नाल्यावर अतिक्रमण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रशासनाकडे कारवाईची मागणी
पावसात पाणी तुंबल्यास पाण्यात बसून आंदोलन
प्रतिनिधी । कुडाळ : शहरातील संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल येथे दरवर्षीच्या पावसाळ्यात फार मोठ्या प्रमाणात पाणी साचून स्थानिक नागरिक, शाळा कॉलेजचे विद्यार्थी तसेच व्यावसायिक यांना खूप त्रास सहन करावा लागतो. असे असतानाही या ठिकाणी एक – दोन खाजगी बिल्डरकडून या भागातील साचणारे पाणी निचरा होणाऱ्या नाल्यावर अनधिकृतरित्या चुकीच्या पद्धतीने काँक्रीटची भिंत तसेच माती भराव करून सदर नाल्याची रूंदी /खोली व दिशा बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याकडे मनसेने प्रशासना चे लक्ष वेधले आहे. मनसेच्या वतीने कुडाळ नगर पंचायत आणि तहसीलदार याना निवेदन देऊन संबंधीतांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कारवाईझाली नाही तर मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता एस एन देसाई चौकात साठलेल्या पाण्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिला आहे.
कुडाळ नगर पंचायतचे मुख्याधिकारी आणि कुडाळ तहसीलदार याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कुडाळ शहरातील संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल येथे दरवर्षीच्या पावसाळ्यात फार मोठ्या प्रमाणात पाणी साचून स्थानिक नागरिक, शाळा कॉलेजचे विद्यार्थी तसेच व्यावसायिक यांना खूप त्रास सहन करावा लागतो. असे असतानाही या ठिकाणी एक – दोन खाजगी बिल्डरकडून या भागातील साचणारे पाणी निचरा होणाऱ्या नाल्यावर अनधिकृतरित्या चुकीच्या पद्धतीने काँक्रीटची भिंत तसेच माती भराव करून सदर नाल्याची रूंदी /खोली व दिशा बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कुडाळ काॅलेज चौकात अभिनवनगर, हाॅटेल अभिमन्यू, तहसीलदार आॅफीस, विठ्ल वाडी ,कुडाळ हायस्कूल मैदान, पोलिस स्टेशन, राणे पेट्रोल पंप, राज हाॅटेल, देसाई पेट्रोल पंप, हाॅटेल चायना टाऊन, उद्यम नगर, RSN हाॅटेल या सर्व परिसरातील पाणी भंगसाळ नदीला जाण्याचा मार्ग हाॅटेल गजाली च्या बाजुने जाणारा पारंपरिक, नैसर्गिक ओहोळ, नाला आहे. हा नाला / ओहोळ पुढे हिंदु काॅलनी, कुडाळेश्वरवाडी, लक्ष्मीवाडी तुन पुढे भंगसाळ नदीला मिळतो. याच नाल्याच तोंड बंद करण्याच आणि नाल्याच रुपांतर चुकीच्या पद्धतीत आपल्या फायद्यासाठी काँक्रीट गटारात करण्याचा घाट सुरु आहे.
या बाबत मनसेने प्रशासनाचे लक्ष वेधले असुन, पाण्याचा प्रवाह, तुंबणारे पाणी बघुन नाल्याची रुंदी, उंची असावी, पाण्याचा नैसर्गिक विसर्ग मार्ग असल्याने काँक्रीट गटारातून प्रवाह विसर्ग होणार नाही. आणि एका दोघांच्या आर्थिक फायद्यासाठी हजारो नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. हि बाब दोन दिवसापूर्वी प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिली आहे. आपत्ती आली की पळणारे नगरपंचायत आणि आपत्ती व्यवस्थापन प्रमुख महसुल यंत्रणेकडून यावर काय कारवाई होते यावर लक्ष असुन.धनदांडग्यां पुढे प्रशासन गुडघे टेकते की सामान्य नागरिकांवर जशी कारवाई करण्यात येते त्याप्रमाणे कायद्याचा बडगा उगारेल का ? कारवाई न होता पाणी चौकात तुंबले तर मनसे पाण्यातच आंदोलन करणार असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिला आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





