आचरा येथे हिंदू जागृती फेरी संपन्न

आचरा : सनातन हिंदू धर्माचाविजय असो,छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, हरहर महादेव, आदी घोषणा देत आचरा वायंगणी गावात सोमवारी हिंदू जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
या फेरीची सुरुवात आचरा रामेश्वर मंदिर येथे अशोक पवार दांपत्याच्या हस्ते ध्वजाचे विधिवत पूजन करून करण्यात आले. यावेळी मानकरी मिराशी,मंदार सरजोशी,मंदार सांबारी,रविंद्र बागवे,मांगिरीष सांबारी, माणिक राणे,चंदू कदम,हेमंत गोवेकर, यांसह हिंदूजनजागृती समितीचे हेमंत मणेरीकर तसेच इतरकार्यकर्ते आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर फेरी रामेश्वर मंदिर कडून सुरु करून आचरा तिठा बाजारपेठ, हिर्लेवाडी वायंगणी, स्वामी समर्थ मठ, करुन दुपारी आचरा तिठा येथे आली. या फेरीदरम्याने चार मार्च रोजी वायंगणी येथे होणाऱ्या हिंदू राष्ट्र जागृती सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
आचरा / कोकण नाऊ / अर्जुन बापर्डेकर