वर्दे येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून १ कोटी २३ लाख ६७ हजार रु. मंजूर
कुडाळ: कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून वर्देमधील कुंभारवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेसाठी १ कोटी २३ लाख ६७ हजार रु. मंजूर झाले आहेत. रविवारी या कामाचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आ. वैभव नाईक यांनी वर्दे गावठणमध्ये भेट देऊन ग्रामस्थांसमवेत बैठक घेऊन विकासकामांवर चर्चा केली. ग्रामस्थांची मते जाणून घेत विकास कामे पूर्णत्वास नेण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी विभाग संघटक संदीप सावंत, पप्पू पालव, युवासेना विभागप्रमुख प्रदीप सावंत, बाळा कुंभार, शाखाप्रमुख सुनील सावंत, पोलिस पाटील सागर पालव, युवासेना शाखाप्रमुख संतोष सावंत, दिलीप सावंत, बंड्या सावंत, काजल सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ