दत्तप्रसाद मयेकर यांचे निधन

वागदे आर्यादुर्गा मंदिरनजीक राहणारे दत्तप्रसाद उर्फ बंड्या विष्णू मयेकर (वय 55) यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवार 16 मे रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अत्यंत शांत, मनमिळाऊ असलेल्या दत्तप्रसाद यांचे कणकवली तहसील कार्यालयानजीक भवानी झेरॉक्स व डीटीपी टायपिंगचे दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना छातीत दुखू लागल्याने एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, तीन बहिणी, भावोजी, भाच्या, भाचे असा परिवार आहे. कणकवलीतील सनराइज टॉवरमधील वीज कर्मचारी फेडरेशन पतसंस्थेच्या कर्मचारी सौ. समृद्धी संजय बागायतकार (कल्पना मयेकर) यांचे ते भाऊ होत.