अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जानवलीतील त्या प्रलंबित सर्विस रस्त्याचे काम सुरू

आमदार नितेश राणे यांचे वेधले होते सरपंच अजित पवार व संदीप सावंत यांनी लक्ष
या सर्विस रस्त्याच्या कामामुळे येथे होणारे अपघात टळणार
गेले काही वर्ष प्रलंबित असलेल्या जानवली साकेडी फाटा येथील सर्विस रस्त्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले. या ठिकाणचे काम प्रलंबित असलेल्या जमीन मालकांना जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने गेली चार ते पाच वर्ष हे काम प्रलंबित होते. मात्र आता ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये या सर्विस रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. जानवली येथील हॉटेल रिलॅक्स पासून ते साकेडी फाट्याच्या पर्यंतचा सर्विस रस्ता करण्यात येणार असल्याची माहिती केसीसी बिल्डकॉनचे व्यवस्थापक पांडे यांनी दिली. दरम्यान हे काम हाती घेण्यात आल्यानंतर येथील काही झाडे जेसीबी द्वारे काढण्यात आली. आमदार नितेश राणे यांचे याबाबत जानवली ग्रामपंचायतचे सरपंच अजित पवार व तेथील भाजपा कार्यकर्ते संदीप सावंत यांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर याबाबत तात्काळ कार्यवाहिच्या सूचना आमदार नितेश राणे यांनी दिल्या होत्या. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर या संदर्भातील हालचाली देखील गतिमान करण्यात आल्या. व हे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. या ठिकाणी सर्विस रस्ता अरुंद असल्यामुळे पुलावरून येणाऱ्या येणारी वाहने व सर्विस रस्त्यावरून येणारी एकत्र येत यामुळे येथे अपघात घडत होते. आता सर्विस रस्ता अरुंद होणार असल्याने भविष्यात होणारे संभाव्य अपघात देखील टळणार आहेत.