साकेडीत घरावर झाड पडून नुकसान

पंचयादी करण्याची करण्यात आलीय मागणी

आज गुरुवारी दुपारी झालेल्या सोसाट्याचा वारा व अवकाळी पावसामुळे तालुक्यात काही ठिकाणी पडझड झाल्याची घटना घडल्या आहेत. यामध्ये दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास साकेडी फौजदारवाडी येथील रामचंद्र घाडी यांच्या घराच्या मागील पडवी व गोठ्यावर चिंचेच्या झाडाची फांदी कोसळून घराचे व गोठ्याचे नुकसान झाले. यावेळी श्री घाडी हे घरात होते मात्र कुणालाही दुखापत झाली नाही. या आज तालुक्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. अवकाळी पावसाने गेले दोन दिवस तालुक्यातल्या काही भागांमध्ये हजेरी लावलेली असताना आज दुपारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्या सह मुसळधार पाऊस झाला. यामुळे काही प्रमाणात वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

error: Content is protected !!