युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ दिंडोशी विधानसभेत मशाल रॅली

युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी रॅलीत दाखल
उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संचाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांच्या दिंडोशी विधानसभा मतदार संघातील मशाल रॅलीत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. अमोलजी कीर्तिकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पुढील 4 दिवस युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व सिंधुदुर्गातील पदाधिकारी सहभागी होऊन मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी प्रयन्त करणार.
अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आज दिंडोशी विधानसभा मतदार संघात ‘संतोषी माता मंदिर ते शांताराम तलाव ‘ येथे प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवासेना कार्यकारणी सदस्य अंकिता प्रभू, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना सिंधुदुर्गजिल्हा विस्तारक अमित पेडणेकर, युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गांवकर आदी युवासेना पदाधिकारी रॅलीत दाखल झाले होते.
कणकवली प्रतिनिधी