फ्लाय ९१ ची सिंधुदुर्ग ते हैदराबाद विमानसेवा सुरु

तिरुपती तीर्थयात्रेच्या वाहतुकीला चालना
आठवड्यातून तीन वेळा उड्डाण करणार
निलेश जोशी । सिंधुदुर्ग : भारतातील नवीनतम विमान कंपनी फ्लाय९१ने सिंधुदुर्ग ते हैदराबाद विमान सेवा सुरु केली आहे. हे विमान चिप्पी (सिंधुदुर्ग) या विमानतळावर आठवड्यातून तीन वेळा उड्डाण घेईल. या सेवेमुळे सिंधुदुर्ग आणि तिरुपती(आंध्र प्रदेश) मधील अंतर कमी झाले आहे,तसेच या तीर्थयात्रेला जाणाऱ्या प्रवाशांचा हा लांबलचक प्रवास फ्लाय९१ने सुख सुविधाने समृद्ध आणि आरामदायी बनवला आहे अशे माहिती फ्लाय९१च्या अधिकाऱ्याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलीआहे.
सिंधुदुर्ग ते बेंगळुरूपर्यंतच्या फ्लाइट ऑपरेशन्ससह सुरू झालेल्या या विमान सेवेने आता हैदराबादला तिच्या विमान सेवा समाविष्ट केल्या आहेत आणि पुण्यासारख्या इतर स्थळांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे. भारताच्या एव्हिएशन ग्रिडवर फ्लाय९१च्या चढाईमुळे दक्षिण महाराष्ट्र प्रदेश देखील सुधारित हवाई संपर्कासाठी खुला झाला आहे.
प्रवासी फ्लाय९१ विमान सेवेला निवडून त्यांचा १५ तासांचा सिंधुदुर्ग ते हैदराबादचा (६२४ किमी) बस प्रवास आता १ तास २५ मिनटात करू शकणार आणि त्यानंतर तिरुपतीला जाण्यासाठी पुढील प्रवासाचा पर्याय निवडू शकतात. विमान सेवेच्या यशामुळे ट्रॅव्हल एजन्सींना ऑल -इन-वन ट्रॅव्हल-कम-तीर्थयात्रा पॅकेजेस तयार करण्यास प्रेरित केले आहे.
आईके ट्रॅव्हल सर्व्हिसेस, संजना टूर्स आणि पेडणेकर टूर्स अँड ट्रॅव्हल्स सारख्या सिंधुदुर्गस्थित एजन्सींनी मे ते ऑगस्ट या कालावधीत प्रवाशांसाठी खास पॅकेजेस तयार केल्या आहेत, ज्यामध्ये प्रतिष्ठित दक्षिणेकडील मंदिर शहराच्या परिपूर्ण सहलीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. परतीच्या विमानभाड्यापासून आरामदायी निवासापर्यंत सर्व या पॅकेजेसमध्ये आहे.
कंपनीचे पॅकेज ११,५०० रु. प्रति व्यक्ती पासून सुरु होतात, या पॅकेजमध्ये हैदराबादच्या प्रसिद्ध चारमिनारला भेट देणे, स्वादिष्ट हैदराबादी खाद्यपदार्थांचा आनंद घेणे आणि तिरुपती मंदिरात आशीर्वाद घेणे समाविष्ट आहे. विद्यार्थ्यांसाठी खास टूर पॅकेजेस देखील आहेत, त्यामुळे प्रत्येकजण फ्लाय९१ सह भारत अनबाउंडचे सार अनुभवू शकतो. सध्या, कंपनीकडे दोन एटीआर ७२-६०० विमाने आहेत, तसेच कंपनी आणखी चार विमाने लवकरच मार्गावर आणण्याच्या प्रयत्न्यात आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पाच वर्षात ५० शहरे विमानसेवेने जोडणार
फ्लाय९१ ही गोव्यातील एक प्रादेशिक विमान कंपनी आहे, ज्याचे लक्ष्य भारतातील लहान शहरांशी हवाई संपर्क सुधारण्याचे आहे. अनुभवी व्यावसायिकांनी स्थापन केलेल्या आणि निधीद्वारे समर्थित, फ्लाय९१ पुढील पाच वर्षांत ५० शहरांना जोडण्याची योजना आखत आहे. ते त्यांच्या ताफ्यात ३० विमाने जोडतील, जी देशभरातील विविध केंद्रांवर असतील. त्यांनी त्यांची सुरक्षा, कार्यक्षमता आणि टिकाऊपणा यासाठी एटीआर ७२-६०० विमाने निवडली आहेत.
निलेश जोशी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.





