एक नारी सबपे भारी

माजी जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांची नारायण राणे यांच्या प्रचारात बाजी

६१ बैठका घेत मतदारांशी साधला संवाद

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकी चे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी आपल्या कणकवली विभागात रात्रंदिवस मेहनत केली आहे.”एक नारी – सबपे भारी” हे तंतोतंत खर करत त्यांनी नारायण राणे यांच्या प्रचारात बाजी मारली आहे. लोकसभा निवडणुकी त नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी आपल्या कणकवली विभागातील अनेक गावोगावी, वाड्यांमध्ये जाऊन मतदार राजाच्या घरोघरी जाऊन भेटी घेऊन नारायण राणे यांचा प्रचार केला. नारायण राणे यांचा प्रचार करत असतानाच संजना सावंत यांनी स्वतः आत्तापर्यंत ६१ बैठका घेत लोकांशी संवाद साधत नारायण राणे यांचा प्रचार केला. आजपर्यंत जिल्ह्यात जो झालेला विकास आहे तो राणे मुळे शक्य आहे , राणे नी नेहमी कोकणच्या विकासाचा च विचार केला आहे,स्ते,पाणी, वीज, शिक्षण व इतर पायाभूत सर्व सोयी राणेंनी कोकणात उपब्धत करून दिल्या आहेत .कोकणचा विकास करायचा असेल तर नारायण राणे यांना निवडून दिले पाहिजे आणि नारायण राणे यांना निवडून आणले तर जिल्ह्यात विकासाची गंगा येईल असे मत संजना सावंत यांनी व्यक्त केला आहे. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ संजना सावंत यांनी रात्रंदिवस घेतलेल्या मेहनती मुळे च त्या नारायण राणे यांच्या प्रचारात अव्वल स्थानी आहेत.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!