कुडाळच्या प्रभाग १ मधील निराधार महिलांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य

प्रभाग १ च्या नगरसेविका ज्योती जळवी यांचे विशेष प्रयत्न

कुडाळ: कुडाळ नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत विधवा आणि निराधार महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी योजना राबविण्यात आली होती. यानुसार, ५८ महिलांचे अर्ज कुडाळ नगरपंचायतकडे प्राप्त झाले होते. यातील सर्वच्या सर्व ५८ विधवा महिला लाभार्थ्यांना याचा लाभ प्राप्त झाला आहे.
यामध्ये प्रभाग क्रमांक १ चे नगरसेविका ज्योती जळवी यांनी सुद्धा आपल्या प्रभागातून अर्ज दाखल केले होते. नगरसेविका ज्योती जळवी यांनी स्वतः पुढाकार घेत या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, कोटेशन, शिफारस पत्रे या महिलांना उपलब्ध करून दिली. यानुसार, दिपाली दिनेश जळवी आणि पूर्वा प्रशांत जळवी यांना नगरसेविका ज्योती जळवी यांनी स्वावलंबी बनविण्यासाठी नगरपंचायतीचे अर्थसहाय्य मिळवून दिले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!