महिला दिनानिमित्त पळसंब येथे ८ मार्च रोजी खुली वक्तृत्व स्पर्धा

आचरा : आंतरराष्ट्रीय महिलादिना निमित्त पळसंब प्राथमिक शाळा येथे बुधवार आठ मार्च रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा स्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी आजची स्त्री आत्मनिर्भर स्त्री महिला अत्याचार कारणे व उपाय, स्त्री स्वातंत्र्य ? की, स्वैराचार खरचं ! स्त्री पुरूष समानता आहे का ? , स्त्रीचे कुटुंबातील स्थान विषय असून यासाठी प्रथम क्रमांक १५०१ रुपये,
द्वितीय क्रमांक १००१ रुपये, तृतीय क्रमांक ७०१ रुपये व प्रत्येकी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उतेजनार्थ दोघांना पारितोषिक देण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी विनोद कदम ९४०४९२९९३६,योगिता कदम ९४२२७४४५७९ यांच्या शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जुन बापर्डेकर / कोकण नाऊ / आचरा