पाठीवर हात ठेवून तुम्ही “फक्त लढ म्हणा”!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत माजी आमदार प्रमोद जठार यांचा वाढदिवस उत्साहात

हा तर “शुभ योग” राणेंनी शुभेच्छा देताना काढले उद्गार!

माजी आमदार प्रमोद जठार यांचा वाढदिवस व माझा उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस एकत्र आल्याने हा शुभ योग आहे. प्रमोद जठार व त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छा श्री देव रामेश्वर पूर्ण करोत अशी प्रार्थना मी करतो. असे उद्गार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढले. प्रमोद जठार हे आपल्या 75 व 100 व्या वाढदिवसा दिवशी माझी आठवण काढतील व मला त्या कार्यक्रमाला बोलवतील अशा शब्दात श्री राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. राणे यांनी “प्रमोद तुला काय पाहिजे?” असे उद्गार काढताच, राजकारणातील दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या प्रमोद जठार यांनी “साहेब तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा” या एका वाक्यात जठार यांनी आपला राजकीय धुरंदरपणा देखील दाखवून दिला. यावेळी त्यांच्यासोबत यावेळी पत्नी सौ. निरजा जठार,सौ निलम राणे,आम.नितेश राणे,अभिषेक जठार, आदित्य जठार,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर,जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, डाॅ.मिलिंद कुलकर्णी,कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल,भाजपा महिला प्रदेश सदस्या दिपलक्ष्मी पडते,प्रमोद जठार मित्रमंडळ अध्यक्ष प्रसाद जाधव, शिडवणे सरपंच रविंद्र शेटये,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत,मानसी वाळवे याच्यासह,प्रमोद जठार मित्रमंडळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथील भाजपा पदाधिकाऱ्यांसह प्रमोद जठार प्रेमी उपस्थित होते. यावेळी प्रमोद जठार यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी एवढी जोरात होती यात काही वेळ राणेंना भाषण थांबवावे लागले. या शुभेच्छांच्या कार्यक्रमादरम्यानच गाण्यांचा मराठी पाऊल पडते पुढे हा सदाबहार कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. त्याला देखील उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!