साकेडी शाळा नंबर 1 ला मोफत लॅपटॉप प्रदान

सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत बांबर्डेकर यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी पुढाकार
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गत शाळे चा झाला होता गौरव
बदलत्या तंत्रज्ञान व संगणक युगाचा उपयोग विद्यार्थ्यांना व्हावा विद्यार्थी देखील या बदलत्या युगा नुसार प्रगत व्हावे. याकरिता साकेडी येथील सेवानिवृत्त अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत बांबर्डेकर यांनी सरस्वती विद्यामंदिर शाळा नंबर 1 साकेडी यांना मोफत लॅपटॉप प्रदान केला. या शाळेच्या वतीने काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे लॅपटॉपची मागणी करण्यात आली होती. व त्यानंतर त्यांनी हा लॅपटॉप प्रदान केला. याप्रसंगी चंद्रकांत बांबर्डेकर यांच्याकडून मुख्याध्यापक समिधा वारंग, शिक्षक प्रभाकर पावसकर, दीक्षा सावंत, उमेश मोरे, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद जाधव, अक्षता राणे आदींनी हा लॅपटॉप स्वीकारला. सामाजिक जाणिवेतून श्री बांबार्डेकर यांनी लॅपटॉप दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. साकेडी शाळा न 1 ला काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून, या शाळेने तालुक्यात मिळवलेल्या नावलौकिकाबद्दल श्री बांबार्डेकर यांनी शाळेच्या शिक्षकांबद्दल कौतुक उद्गार काढले. तसेच शाळेसाठी यापुढेही भविष्यात कोणतीही मदत भासल्यास हक्काने हाक मारा असे आवाहन त्यांनी केले. तसेच शाळा प्रशासनाच्या वतीने सौ. वारंग यांनी बाबर्डेकर यांचे आभार मानले.
कणकवली प्रतिनिधी