युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत रेवण राऊळ जिल्ह्यात दुसरा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाचा इयत्ता सहावीत शिकणारा विद्यार्थी कु. रेवण अनंत राऊळ याने सदर परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.कुमार रेवण हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचे हे सातवे वर्ष आहे.या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह,पदक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले. इयत्ता चौथी ते सातवीतील टॉप फाईव्ह विद्यार्थ्यांना विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे भेटीसाठी नेण्यात येणार आहे ,सदर योजनेत कुमार रेवण राऊळ चे नाव समाविष्ट आहे. अनेक शालेय व सहशालेय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रेवणचे समाजातील शिक्षण प्रेमीनी कौतुक केले आहे. रेवणच्या या यशाबद्दल त्याचे शेठ न म विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सानप सर , पर्यवेक्षक श्री. राऊत सर , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्था अध्यक्ष माननीय श्री. प्रवीण लोकरे व सर्व विश्वस्तांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!