महायुतीचा उमेदवार लोकसभेत राष्ट्रवादी च्या महत्त्वपूर्ण सहभागाने विजयी होईल!

राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे प्रतिपादन
होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रबादी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने काम करावे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाप्रमाणे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी सर्वांनी कामाला लागा. विजय हा महायुतीचाच होईल व त्यात राष्ट्रवादीचा वाटा महत्वाचा असेल. मात्र महायुतीचा धर्म सर्व घटक पक्षांनी पाळला पाहिजे. प्रत्येकाने एकमेकांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. राष्ट्रवादीला सन्मान मिळावा, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची मागणी आहे. त्यानुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशीही चर्चा करण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी येथे केले.
येथील महिला व काथ्या उद्योगाच्या समागृहात आयोजित जिल्हा कार्यकारिणी बैठकीत अबीद नाईक बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष काका कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, एम. के. गावडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, तालुकाध्यक्ष उदय भोसले (सावंतवाडी), राजेंद्र पावसकर (कणकवली), वैमव रावराणे (वैभववाडी), नाथा मालंडकर (मालवण), आर. के. सावंत (कुडाळ), सत्यवान गवस (दोडामार्ग), संदीप पेडणेकर (वेंगुर्ले), प्रांतिक सदस्य बाळा कायेंडे (देवगड), सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, संदीप राणे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अस्लम खतीब, अल्पसंख्यांक प्रदेश महासचिव शफिक खान, जिल्हा सचिव विलास पावसकर, राजू धारपवार, प्रमाकर चव्हाण, मेधेंद्र देसाई, दीपक देसाई, कणकवली शहराध्यक्ष इमरान शेख, कणकवली चिटणीस गणेश चौगुले, राजेंद्र पिसे, माई डंबे, जिल्हा सचिव सुशिल चमणकर, संतोष राऊळ, तालुका कृषी अध्यक्ष शामसुंदर राय आदी उपस्थित होते.
श्री. नाईक पुढे म्हणाले, महायुतीत प्रत्येक घटक पक्षाने एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, जिल्हा नियोजन समितीचा निधी अथवा इतरही जिल्ह्यातील समित्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात घेऊन सहमागी करून घ्यावे, यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. लोकसमा निवडणुकीत घटक पक्षांना राष्ट्रवादीकडून कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही श्री. नाईक यांनी केली.
श्री. नाईक म्हणाले, महायुतीमध्ये अजितदादा पवार, सुनील तटकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी प्रचारात सहमाग घेऊन महायुतीच्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया. लोकसमा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महायुतीचे समन्वयक म्हणून सिंधुरत्न समितीचे सदस्य अजित यशवंतराव यांची निवड प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. येत्या दोन तीन दिवसांत त्यांचे मार्गदर्शनही लामणार आहे. लोकसमा निवडणूक महायुतीद्वारे लढणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची समन्वय समितीही स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये मी स्वतः, काका कुडाळकर, सावळाराम अणावकर, सुरेश गवस, एम.
के, गावडे, प्रज्ञा परब, उदय भोसले यांचा समावेश आहे. काका कुडाळकर म्हणाले, महायुतीमध्ये सर्व घटक पक्षांचा सन्मान झाला पाहिजे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे, यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष द्यावे.
एम. के. गावडे म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक पक्षाने समन्वय राखला पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या व्यथा, समस्या घटक पक्षांशी, पालकमंत्र्यांशी चर्चा करून सोडविल्या जातील. मात्र त्यासाठी प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळावा.
सुरेश गवस यांनीही महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक सावळाराम अणावकर यांनी केले.
सिंधुदुर्ग प्रतिनिधी