हळवल येथे श्रीराम मंदिर शतक महोत्सवी रामनवमी उत्सव आणि कलशरोहण सोहळा

प्रतिनिधी । कणकवली : श्रीराम सेवा मंडळ मुंबई मु.पो.हळवल,ता. कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यावतीने श्रीराम मंदिर शतक महोत्सवी रामनवमी उत्सव व कलशरोहण सोहळा मंगळवार दि.९ एप्रिल ते रविवार दि.२१ एप्रिल २०२४ या दरम्यान संपन्न होत असून मंदिरात होणारे दैनंदिन कार्यक्रम व श्रीराम नवमी उत्सव सांगता समारंभात ग्रामस्थ,भाविक बंधू भगिनींनी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळी सह धार्मिक सोहळयास उपस्थित राहून श्रीराम दर्शन व तिर्थप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम सेवा मंडळ मुंबई (हळवल) यांच्यावतीने करण्यात आले आहे.
श्री रामनवमी उत्सवानिमित्त बुधवार . दिनांक १७ एप्रिल २०२४ सकाळी ८.३० वा.श्रीराम षोडशोपचार पुजा,सकाळी ९.०० वा.उत्सवाचं ग्रामदेवतेला आमंत्रण, सकाळी १०.३०वा. श्रीराम जन्माचे कीर्तन -ह.भ.प. नामदेव पांडुरंग महाराज, दुपारी १२.०० वा. राम जन्म सोहळा दर्शन व तिर्थप्रसाद, दुपारी १.०० वा. श्रीराम पालखीचे अभंग ढोल ताशांच्या गजरात व राम नामाच्या जयघोषात प्रदक्षिणा, दुपारी १.३०वा. महाप्रसाद (प्रायोजक श्रीराम सेवा मंडळ, मुंबई),सायं.७.३० वा. वारकरी भाविक व बाल गोपाळांचा हरिपाठ, रात्रौ ८ ते ९ श्रीराम प्रासादिक भजन मंडळ,हळवल यांचे भजन,रात्रौ ९ वाजता श्रीराम पालखीचे अभंग टाळ ढोलताशाच्या गजरात व श्रीराम नामाच्या जय घोषात प्रदक्षिणा,रात्रौ ११ वाजता कीर्तन,रात्रौ १२ वाजता दशावतारी नाटक (श्री शिवराई रवळनाथ नाट्यमंडळ,हळवल संचालक-अरुण राणे) तसेच गुरुवारी दिनांक १८एप्रिल २०२४ रोजी श्रीराम नवमी उत्सव समाप्ती व महाप्रसाद कार्यक्रम दुपारी १.०० ते ३.००वा होणार आहे.
श्रीराम मंदिर कलशरोहण सोहळा
शुक्रवार दि.१९एप्रिल २०२४ सकाळी ८.३० ते १२वा. कलशाची संवाद्य शोभायात्रा (परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थान कणकवली ते श्रीराम मंदिर हळवल),दुपारी १.०० वाजता महाप्रसाद (ज्ञानदेव राणे हळवल यांच्या सौजन्याने) सायं.७.००वा.रामराज्याभिषेक व किर्तन,रात्र ९.००वा. दशावतारी नाटक- गुरुकृपा पारंपारिक दशावतारी लोककला नाट्यमंडळ हळवल, संचालक-मारुती सावंत हळवल, शनिवार दिनांक २० एप्रिल २०२४ सकाळी ९.००ते दुपारी १.००वाजेपर्यंत विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर सकाळी ५.३०वा. काकड आरती,सकाळी ८ ते १० वाजता धार्मिक कार्यक्रम दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद (श्री दत्ताराम साटम यांच्या सौजन्याने)सायं.३ते ६ वाजता खेळ पैठणीचा (मंडळाच्या कुटुंबियांसाठी मर्यादित) सायं.६ ते ७ वाजता पंचमुखी हनुमान सेवा मंडळ संचालित कै. केशव राणे यांच्या स्मरणार्थ आस्तिक ब्रास बँड पथक वरळी कोळीवाडा यांचे बँड वादन, ७ ते ८वाजता हरिपाठ, रात्र ८ ते १०वा.ह भ प भूषण वरखले महाराज (आळंदी) यांचे सुश्राव्य कीर्तन,रात्रौ ११ वा. स्थानिक भजने
रविवार दि. २१एप्रिल २०२४रोजी पहाटे ५.३० वाजता काकड आरती, सकाळी ८ते ११धार्मिक कार्यक्रम, सकाळी ११.३० वाजता शिखर कलशविधी -श्री गावडे काका महाराज (माड्याचे वाडी) ता. कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या शुभहस्ते, ११ ते १२.३० वाजता पंचमुखी हनुमान सेवा मंडळ संचालित आस्तिक ब्रांड ब्रास पथक वरळी कोळीवाडा यांचे सुस्वर बँड वादन,दुपारी १ ते ३वाजता महाप्रसाद ,सौज्यन्य मेधा लवू राणे,पोलीस उपनिरिशक मुंबई, सायंकाळी ३ ते ६ वाजता शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६ ते ९ स्मरणिका प्रकाशन व मान्यवरांचे सत्कार, पालखी प्रदक्षिणा,रात्रौ १०वा. पौराणिक दशावतारी नाटक खानोलकर दशावतारी नाट्य मंडळ खानोली,ता. वेंगुर्ला -वाली सुग्रीव युद्ध ,सदर सर्व कार्यक्रमाचा लाभ सर्वीनी घ्यावा अशी विनंती श्रीराम सेवा मंडळ,मुंबई (हळवल) यांच्यावतीने करण्यात आले आहे
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कणकवली