कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी निलेश जोशी

सचिवपदी वैशाली खानोलकर

नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी निलेश उर्फ बंड्या जोशी तर सचिवपदी वैशाली खानोलकर यांची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उर्वरित कार्यकारिणी सुद्धा निवडण्यात आली.
. कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष आनंद मर्गज यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तो जिल्हा पत्रकार संघाने मंजूर केल्याने अध्यक्ष पदासह संपूर्ण कार्यकारिणीची निवड शनिवारी पुन्हा नव्याने करण्यात आली. यासाठी कुडाळ उद्यमनगर येथील वासुदेवानंद सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळ खडपकर आणि सदस्य महेश सरनाईक, बाळ खडपकर उपस्थित होते.
अध्यक्षपदासाठी सर्वांमध्ये चर्चा झाल्यांनतर या पदासाठी निलेश जोशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सचिव वैशाली खानोलकर, उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर व चंदु शेडगे, सहसचिव राजाराम परब, खजिनदार विठ्ठल राणे, सदस्य म्हणून प्रमोद ठाकूर, प्रमोद म्हाडगुत, चंद्रकांत सामंत, विजय पालकर, गुरुप्रसाद दळवी, अरुण अणावकर यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा सदस्य राजन नाईक, कुडाळ तालुका पत्रकार समितीचे माजी खजिनदार अजय सावंत, पद्माकर वालावलकर, भरत केसरकर, भूषण देसाई, शंकर कोराणे, काशीराम गायकवाड़, प्रसाद राणे, गोपाळ चव्हाण आदी उपस्थित होते.
एकमताने कार्यकारिणी निवडल्याबद्दल तालुका समिती सभासदांचे खंडापकर आणि सरनाईक यांनी आभार मानले. जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच तालुका पत्रक समितीमधील आजी माजी .ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, नूतन तालुका कार्यकारणी आणि सभासद याना विश्वासात घेऊन काम करणार तसेच समितीमार्फत विविध उपक्रम राबविण्याचा मानस नूतन अध्यक्ष जोशी यांनी व्यक्त केला.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!