अशोक पां.कांबळे(शेर्पेकर) राज्यस्तरीय तेजस्वी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

तेजस्वी फाउंडेशन ,ठाणे तर्फे देण्यात येणार २०२४ चा राज्यस्तरीय तेजस्वी समाज भूषण पुरस्कार आयु.अशोक पांडुरंग कांबळे,
शेर्पेकर याना नुकताच गप्पागोष्टीकार मा.जयंत ओक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी तेजस्वी फाउंडेशनच्या संस्थापिका ,लेखिका,समीक्षक,प्रवचनकार, प्रा.प्रज्ञा पंडित ,/प्रा.डॉ अशोक पाटील सुप्रसिद्ध लेखक,/मा. डॉ.श्रद्धा भोमे प्राचार्य -जे के कॉलेज ऑफ सायन्स & कॉमर्स इ.मान्यवर उपस्थित होते.
अशोक कांबळे ,शेर्पेकर हे बौद्धजन सेवा संघ खारेपाटण विभाग मुंबईचे अध्यक्ष . / सिंपन (सिंधुदुर्ग परिवर्तन नवनिर्माण) प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष. / बौद्धजन पंचायत शाखा समन्वय समिती नालासोपारा (पु)चे प्रमुख संघटक./बौ.पं.समिती शाखा क्र.५६९ चे अध्यक्ष अशा विविध पदावर कार्यरत आहेत.
सामाजिक, धार्मिक,साहित्य क्षेत्रामध्ये वावरत असताना समाजहिताच्या प्रश्नांवर केलेले लिखाण आणि त्या लिखाणातून सुचवलेले उपाय पर्यायी मार्ग यांचं मूल्य मापन करून काही धार्मिक, सामाजिक संघटनांकडून बरेचसे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत .आदर्श समाजसेवा पुरस्कार-मेधाताई पाटकरांच्या हस्ते.
देशव्यापी श्रमशक्ती पुरस्कार-मुंबईच्या महापौर डॉ शुभा राऊळ यांच्या हस्ते./ राजर्षी शाहू महाराज समता सेवा पुरस्कार-कामगार नेते विजय कांबळे यांच्या हस्ते. /डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवक रत्न पुरस्कार-,भारताचे अर्थ तज्ञ डॉ भालचंद्र मुणगेकरांच्या हस्ते,/ डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार-भारतीय दलित साहित्य अकादमी,/गौरव पत्र-महात्मा फुले प्रतिष्ठान,तिसरे फुले,शाहू, डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन 2010 प्रमुख पाहुणे अशोक राव चौहान ,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. सुनिर्मल गौरव पुरस्कार 2022.कणकवली तालुक्यातील शेर्पे हे त्यांचं गाव.आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि समाजकार्य यावर लक्ष केंद्रित करून त्यांनी आपल्या कामास सुरुवात केली.आजच्या या राज्यस्तरीय तेजस्वी समाजभूषण पुरस्काराने त्यांचे विविध स्तरातून कौतुक होतंय.याच सर्व श्रेय ते आपले वडील कालकथीत बौद्धचार्य पांडुरंग तात्या कांबळे याना देतात त्यांच्यामुळेच मी समाजकार्यात ओढला गेलो अस ते म्हणतात.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण