कार्यकारी अभियंत्यांच्या दालनातील पुष्पगुच्छचा डोंगर ठरतोय लक्षवेधी!

वाढदिवसानिमित्त “मार्च एंड” दिवशीच कार्यकारी अभियंता दालनात तुफान गर्दी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारे शुभेच्छा मिळवणारे “अजयकुमार सर्वगोड” बहुदा पहिलेच अधिकारी

अधिकारी कसा असावा, अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख काम कसे करावे व तसा हेतू ठेवून काम केलेल्या अधिकाऱ्याला सिंधुदुर्गातली जनता कसा रिस्पेक्ट देते याचा अनुभव व उदाहरण म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याकडे पाहावे लागेल. कारण कालच त्यांचा वाढदिवस साजरा झाला व या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कणकवलीतील कार्यालयात 31 मार्च दिवशी सुट्टी असून देखील सर्वगोड यांना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः जनता, कार्यकर्ते व ठेकेदार यांनी तोबा गर्दी केली. अधिकारी म्हणून सर्वगोड यांची कारकीर्द ही आतापर्यंतच्या सा बा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तुलनेत उजवीच राहिली. परंतु अधिकारी असून देखील समाज जीवनात पॉझिटिव्ह राहून काम करणाऱ्या सर्वगोड यांच्यावर अक्षरशा शुभेच्छांचा वर्षाव करताना त्यांच्या दालनातील टेबल पुष्पगुच्छ ठेवायला कमी पडायला लागलं. पुष्पगुच्छच्या गर्दीत अजयकुमार सर्वगोड हे दिसेनासे झाले. ही सर्वगोड यांनी मिळवलेली खऱ्या अर्थाने शिदोरी म्हणावी लागेल. कार्यकारी अभियंता कार्यालयात 31 मार्चला ठेकेदारांची रिंघ असते. मार्च एंड ची बिले काढण्यासाठी घाई गडबड असते. मात्र असे असून देखील सर्वगोड यांच्या दालनात त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी केलेली गर्दी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्याला शुभेच्छा देण्यासाठी बहुदा झालेली पहिलीच गर्दी असावी. एखाद्या राजकीय नेत्याला देखील काहीसे लाजवेल असा सर्वगोड यांच्या दालनात पुष्पगुच्छ चा डोंगर पाहून निश्चितच हे अधिकारी की राजकीय नेते अशी शंका काही काळी यावी. मात्र तरी देखील आपण लोकसेवक आहोत याची जाण ठेवून काम करणाऱ्या सर्वगोड यांच्या बाबतीत जिल्ह्यातील जनतेला आलेला हा एक आगळावेगळा अनुभव मात्र निश्चितच अविस्मरणीय असाच ठरणार आहे.

दिगंबर वालावलकर, सिंधुदुर्ग

error: Content is protected !!