दिल्लीतील रॅलीत आपचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार

आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांची माहिती
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाला यांच्या अटेकविरोधात इंडिया विरोधी आघाडीने पुन्हा एकदा एकजूट दाखवली आहे. रविवार ३१ मार्चला दिल्ली येचील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून एक मेगा रॅली आयोजित केली आहे. या रॅलीला सिधुदुर्ग जिल्ह्यातील आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते जाणार आहेत, अशी माहिती आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी दिली आहे.
भाजपच्या विरोधात विरोधी पक्षाचा नेता बोलला की, त्याला ईडी, सीबीआय चौकशी लावून अटक करायची आणि जेलमध्य टाकायचे, हे षडयंत्र भाजप सरकारने रचले आहे. या हुकूमशाही व दडपशाही विरोधात इंडिया आघाडी एकसंघ आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंडिया आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे ३१ रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या इंडिया आघाडीच्या रॅलीसाठी जिल्ह्यातील आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिल्ली जाणार आहेत, असे ताम्हणकर यांनी यावेळी सांगितले.
कणकवली, प्रतिनिधी