सरंबळ येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

कुलस्वामिनी कृषी बचत गट सरंबळ यांच्या वतीने आयोजन

कुलस्वामिनी कृषी सेवा बचत गट सरंबळ आणि नॅब नेत्र रुग्णालय, मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २० मार्च २०२४ रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत गावडे सभागृह ग्रामपंचायत सरंबळ,तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले होते
सदर शिबिरास गावातील ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण ७७ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली त्यापैकी ८ जणांना मोतीबिंदू व २२ जणांना चष्म्याचे निदान करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन माननीय सरपंच श्री रावजी कदम ग्रामपंचायत सरंबळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी सरंबळ पोलीस पाटील श्री दिलीप वराडकर, पशुवैद्यकीय अधिकारी सरंबळ श्री सुचित खवणेकर,पोस्टमास्तर अमृता पिंगुळकर ,मॅडम ग्रामसेविका सौ.अश्विनी कुंभार मॅडम, नेत्रचिकित्सा टीमचे श्री रमेश जगदाळे ,कुलस्वामिनी कृषी बचत गटाचे अध्यक्ष श्री अजय राणे, उपाध्यक्ष श्री शामसुंदर परब, सचिव श्री मंदार मोहिते तसेच बचत गटाचे सदस्य श्री गुरुनाथ परब, श्री समीर कदम ,श्री अमित झोरे ,श्री भिवा गावकर ,श्री सुहास सुर्वे ,श्री घनश्याम साटम, श्री आनंद गावडे ,श्री अमित राणे ,श्री मनोज दांडकर ,श्री संतोष राणे ,श्री महादेव वंजारे व अंकुश परब हे उपस्थित होते.
नेत्र तपासणी शिबिराला उपसरपंच श्री सागर परब यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री योगेश नाईक यांनी भेट देऊन शुभेच्छा व आर्थिक सहकार्य देखील केले सर्वात शेवटी कुलस्वामिनी कृषी बचत गटाचे सचिव श्री मंदार मोहिते यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!