कै.कवयित्री नलिनी नारायण कुवळेकर स्मृतिनिमित्त स्वरचित वृत्तबद्ध काव्य स्पर्धा

सिंधुदुर्ग – ऐलमा पैलमा अक्षरदेवा,सिंधुदुर्ग साहित्यिक महिला समूह आयोजित कै.कवयित्री नलिनी नारायण कुवळेकर स्मृतिप्रीत्यर्थ वृत्तबद्ध,कविता स्पर्धा जाहीर करीत आहोत.
ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवींसाठी आहे.
कविता स्वरचित वृत्तबद्ध असावी.
वृत्तात नसलेली कविता स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.
विषयाचे बंधन नाही.
कविता या आधी कुठल्याही माध्यमात प्रसिद्ध झालेली नसावी किंवा बक्षीस मिळालेली नसावी
या स्पर्धेसाठी कै.नलिनी नारायण कुवळेकर परिवार पुरस्कृत तीन पारितोषिके दिली जातील.
प्रथम कवितेला रोख रूपये 5000.
द्वितीय 3000
तृतीय 2000
परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
निकाल 13 मे रोजी जाहीर होईल.बक्षीस वितरण समारंभाबद्दल नंतर कळवले जाईल.
कविता पाठवण्याची 25 एप्रिल 2024 ही अंतिम तारीख आहे.त्यानंतर आलेली कविता स्वीकारता येणार नाही.
कविता स्वहस्ताक्षरात लिहून पुढील पत्त्यावर पाठवाव्यात.
संपदा सुधीर प्रभुदेसाई
भवानी अपार्टमेंट, A विंग,
दुसरा मजला.
पाकळे हाॅस्पिटलजवळ
नाथ पै नगर
मु.पो.ता. कणकवली
जि. सिंधुदुर्ग ४१६६०२
फोन 8806725303
अधिक माहितीसाठी
या नंबरवर फोन करता येईल.
वैशाली पंडित 9422043025
सदस्य
ऐलमा पैलमा अक्षरदेवा सिंधुदुर्ग महिला साहित्य समूह.
कणकवली, प्रतिनिधी