महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा २०२३-२४अंतर्गत शालेय शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा या प्रशालेने घवघवीत यश संपादन केले..

जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने गट क्रमांक चार मधून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच गट क्रमांक तीन मधून सुरेश सुहास सावंत याने तृतीय क्रमांक व ममता महेश आंगचेकर या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. तसेच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत वराडकर हायस्कूल कट्टाचे नावलौकीक केलेल्या प्रशालेच्या विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांदरकर व सानिया अनिल कुडतरकर यानाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ पुणे जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित कार्यशाळेत बाल चित्रकला स्पर्धेत चा पारितोषिक वितरण सोहळा माध्यमिक अध्यापक पतपेढी सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला. .
. बालचित्रकला स्पर्धेतील विजेत्याना मा.श्रीमती कविता शिंपी शिक्षणाधिकारी माध्यमिकजि. प. सिंधुदुर्ग,, मा. श्रीमती शलाका तांबे, रा.प. अधिकारी, जि. प.सिंधुदुर्ग, श्रीमती अफसाना बेगम आवटी प्रभारी उपशिक्षणाधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग,श्री बलराम सामंत राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ, श्री प्रकाश महाभोज अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या प्रमुख उपस्थित सन्मानित करण्यात आले.
. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले.कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त- कर्नल (सेवानिवृत्त )श्री.शिवानंद वराडकर ,ऍड.एस एस पवार , अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर,उपाध्यक्ष श्री.आनंद वराडकर,श्री.शेखर पेणकर ,सचिव-श्री.सुनिल नाईक ,श्रीम.विजयश्री देसाई,सहसचिव -श्री.साबाजी गावडे ,खजिनदार -श्री.रविंद्रनाथ पावसकर ,सर्व संचालक ,शालेय समिती अध्यक्ष श्री.सुधिर वराडकर, वराडकर स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक सर्व सहकारी शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले!