मसुरे डांगमोडे बेलाचीवाडी विरण रस्त्याचे भूमिपूजन

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाला यश जनतेद समाधान
आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून अखेर गेल्या कित्येक वर्षांची विरण- बेलाचीवाडी डांगमोडे मसुरे या रस्त्याच्या गंभीर समस्येची पूर्तता झाली असून सदर रस्त्याला खडीकरण डांबरीकरण साठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 3 कोटी 8 लाख निधी मंजूर झाला असून या मंजूर रस्ता कामाचे भूमिपूजन नुकतेच बेलाची वाडी शिवसेना शाखा येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले
सदर कामाची अवस्था अतिशय बिकट झालेली होती वाहतूक दाराना जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागत होती याकरिता बेलाची वाडी शिवसेना शाखेच्या वतीने आज 4 वर्षे वारंवार मागणी करून सतत पाठपुरावा केल्याने अखेर ही मागणी पूर्ण झाल्याने येथील जनतेत समाधान व्यक्त होत असून आमदार वैभव नाईक यांचे जाहीर अभिनंदन होत आहे
मंजूर रस्त्याचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह उपस्थित शिवसेना पदाधिकारी मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार शिवसेना शाखा बेलाचीवाडी च्या वतीने करण्यात आला
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी उपस्थित कार्यकर्ते ग्रामस्थ महिला यांना मार्गदर्शन केले आमदार नाईक यांच्या यशस्वी कार्यकतृत्वाची माहिती देत त्यांची त्यांची अपार लोकप्रियता आणि विकास कामांचा धडाका मालवण कुडाळ विधानसभा निवडणुकीत जनता त्यांच्यात पाठीशी उभी राहील व ते विजयाची हॅट्रिक करतील दिलेला शब्द पाळणारा आणि सत्य करून दाखवणारा असा एकमेव आमदार आमदार म्हणजे वैभवजी नाईक अशी त्यांची स्तुती केली
तसेच आमदार वैभव नाईक यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की मी सर्वसामान्यांचा आमदार असून जनतेच्या विकासाला प्राधान्य देतो विकासाचे राजकारण न करता सर्वांना सामान न्याय देण्याचे प्रयत्न गेली 10 वर्षे करीत आहे तसेच त्यांचे श्रेय म्हणून आम्ही आशीर्वाद मिळवून मी नेहमीच प्रत्येक गोष्टीत यशस्वी होत आहे तुम्ही सर्वांनी येथील पक्ष संघटना मजबूत ठेवून आगामी निवडणुकीत आपल्या उबाठा गटाचे आमदार ,खासदार भरघोस मतांनी विजयी करा विरोधकांच्या भुलथापांना व आमिषांना बळी न पडता तुमची निष्ठा अबाधित ठेवा तुमच्या सर्वांगीण विकास साठी मी सदैव तत्पर आहे असे आवाहन केले
या भूमीपूजन कार्यक्रमा वेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर ,विजय पालव ,पराग नार्वेकर ,रुपेश वर्दम ,चंद्रकांत मिठबांवकर, विजय घाडीगावकर ,समीर परब, बबन परब ,जयेश नार्वेकर, पंकज वर्दम गोविंद परब ,सुहास सुर्वे, उत्तम घाडीगावकर ,मोहन घाडी गावकर ,शामकांत घाडीगावकर ,लक्ष्मण घाडीगावकर, लक्ष्मण मालडंकर ,सतीश राठोड, बंडू वाडकर, रामचंद्र घाडीगावकर ,रुपेश घाडीगावकर ,रत्नाकर घाडीगावकर, सच्चिदानंद घाडीगावकर,चंद्रकांत बागवे, शिवरामपंत पालव व शिवसेना कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
संतोष हिवाळेकर पोईप