आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामाचे चुनवरे येथे भूमिपूजन जनतेत समाधान

कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या चुनवरे गावठणवाडी येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेत फ्लेवर ब्लॉक बसण्यासाठी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत रुपये वीस लाख निधी मंजूर झाला असून .त्या कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार वैभव नाईक यांचे उपस्थित देवस्थानचे मानकरी वसंत गावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले
यावेळी श्री देव रामेश्वराचे दर्शन घेवून आगामी निवडणुकीत शिवसेना उबाठा चे आमदार ,खासदार दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी व्हावेत यासाठी ग्रामस्थांच्या वतीने साकडे घालण्यात आले
तर याच ठिकाणी आमदार वैभव नाईक व इतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विरण बाजारपेठ ते चुनवरे हरिजनवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढून झाले
या कामासाठी रुपये 1कोटी 92 लाख निधी मंजूर झाला असून जनतेची फार मोठी समस्या मार्गी लागणार असल्याने येथील जनता समाधान व्यक्त करीत असून आमदार वैभव नाईक यांना धन्यवाद देत आहेत
या कार्यक्रमाचे वेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, विजय पालव ,पराग नार्वेकर, रुपेश वर्दम,पंकज वर्दम,बंडू वाडकर ,गोविंद परब, सुहास सुर्वे, मोहन घाडीगावकर ,चंद्रकांत मिठबांवकर ,विजय घाडीगावकर ,शामकांत घाडीगावकर ,शिवराम पंत पालव, सदानंद सावंत ,तुकाराम परब,सत्यवान तळेकर ,वसंत परब ,भाऊ चव्हाण ,बाळकृष्ण परब, महेश परब,जगदीश परब, विनायक परब,नामदेव परब ,अमित परब, समीर परब,अमोल परब, धोंडी परब ,भिकाजी परब ,चंद्रकांत बागवे व बहुसंख्य शिवसेना कार्यकर्ते महिला ग्रामस्थ उपस्थित होते
संतोष हिवाळेकर पोईप