बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजप्रबोधन समन्वय समिती, सावंतवाडी नवीन कार्यकारणी जाहीर

विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजप्रबोधन समन्वय समिती ची सभा आज समाजमंदिर, सावंतवाडी येथे आयु सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये २०२४-२५ या वार्षिक वर्षासाठी नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष आयु. केशव जाधव, कारिवडे, उपाध्यक्ष – आयु. जगदिश चव्हाण, कोलगाव, सचिव-आयु. विनायक जाधव, कोलगाव, कोषाध्यक्ष- लक्ष्मण कदम, वेर्ले यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भरखच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिला समुहगीत गायन स्पर्धा, रक्तदान शिबीर व शाहू-फुले-आंबेडकर व्याख्यानमाला रैली निमित्त चित्ररथ याचे नियोजन करण्यात आले वर्षभरात घेतलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीमध्ये मागील वर्षाचा कार्य अहवाल सचिव आयु. सुरेश जाधव यांनी वाचून दाखविला. २०२३ या वर्षात १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम तसेच ७ एप्रिल २०२३ ला रक्तदान शिबीर, ९ एप्रिल २०२३ ला महाकवी शाहीर वामन दादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी निमित्त महिला समूह गीत गायन स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम असे विविध उपक्रम राबिविण्यात आले होते.

या बैठकीसाठी बामसेफचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र जाधव, भारत मुक्ती पार्टी चे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव , भारतीय विध्यार्थी मोर्चाचे आयु. सगुण जाधव, आयु. डॉ. प्रा. देविदास बोर्डे सर, आयु. विलास कासकर सर, बौद्ध हितवर्धकचे तालुका अध्यक्ष आयु महेंद्र सावंत, बौद्ध हितवर्धकचे सचिव आयु. तिळाजी जाधव, त्रैलोक्य महासंघाचे आयु. शांताराम असनकर, विनायक तांबळे, सद्गुरू जाधव, सिंधुदुर्ग चर्मकार उन्नत्ती मंडळचे आयु. दिलीप इन्सुलकर, आयु. जगदिश चव्हाण, भारतीय बौद्ध महासभेचे आयु. सुरेश जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे आयु. सुनील जाधव, आयु. केशव जाधव असे असे विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!