हुमरमळा-वालावल मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा

हुमरमळा ग्रा.प. ची नवीन इमारत होणार

निलेश जोशी । कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा-वालावल येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले. यामध्ये देसाई वाडा पुलाचे, बिजोळेवाडी पुलाचे,बांधकोवाडी रस्ता या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी आमदार वैभव नाईक यांनी पाठ पुरावा केला होता.हुमरमळावासिंयांनी जी जी विकास कामे मागितली ती त्यांना दिली आहेत. खासदार विनायक राऊत व माझ्यावर हुमरमळावासिंयांनी सतत प्रेम दाखवले त्याची ही पोचपावती आहे असे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.
हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायत इमारतीचे भुमिपुजन कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, हुमरमळा गाव छोटासा असला तरी इथले ग्रामस्थ प्रामाणिक आहेत. गेली दहा वर्षे माझी त्यांची नाळ विकासातुन जुळलेली आहे. अतुल बंगे असो की अर्चना बंगे यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीची विजयाची परंपरा आजही ठेवली आहे. हुमरमळा वालावल गावांसाठी खासदार विनायक राऊत यांनी मोबाईल टॉवर दिला म्हणून विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय दुर झाली. जे जे काम मागितले ते देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. निवडणुका आल्या कि गावात येऊन काही लोक अपप्रचार करतात. पैशाची आमिशे दाखवतात. परंतु ही पद्धत हुमरमळावासिंयांनी धुडकावून लावत खऱ्या अर्थाने कायमच लोकांच्या प्रश्नांसाठी धडपड करत असलेले अतुल बंगे, अर्चना बंगे यांच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे पुन्हा या ग्रामपंचायतींवर सरपंच अमृत देसाई विराजमान झाले. आज हुमरमळा-वालावल ग्रामपंचायत भुमिपुजन होत आहे. खासदार विनायक राऊत आणि मी या ग्रामपंचायतीला निधी दिला. ही वास्तु भव्य दिव्य व्हावी यासाठी आणखिन कितीही निधी लागला तरी आपण आणि खासदार राऊत साहेब देऊ असे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले.
, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सरपंच अमृत देसाई, अतुल बंगे, गटविकास अधिकारी श्री जगताप यांनीही विचार मांडले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच स्नेहल सामंत यांनी केले.
या कार्यक्रमाला माजी सरपंच सौ अर्चना बंगे, उपसरपंच सौ रश्मी वालावलकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे , शाखाप्रमुख रमेश परब, ग्रामपंचायत सदस्य तथा युवा सेना मितेश वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ हेमांगी कंद्रेकर,सौ संजना गुंजकर, ग्रामसेविका श्रीम अपर्णा पाटील, ग्रामविस्तार अधिकारी संजय ओरोसकर,सोनाली मांजरेकर,रेणुका परब ,युवा सेना उपशाखा प्रमुख आशु परब, काशिनाथ तुळसकर, गणेश कानडे, शैलेश मयेकर, अमित बंगे, श्रीपाद कानडे,जितु सावंत,आशु देसाई,बाबु तावडे, स्नेहल सामंत, योगेश कानडे, रुपेश तुळसकर, नेरुर ग्रामपंचायत सदस्य मंजुनाथ फडके उपस्थित होते.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!