मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, अभियानात साकेडी शाळा नंबर 1 तालुक्यात द्वितीय

क्रीडा स्पर्धेपाठोपाठ साकेडी शाळा नंबर 1 चे या स्पर्धेत देखील घवघवीत यश

जिल्ह्यात प्रथम क्रमांक साठी यापुढे प्रयत्न करण्याचा निर्धार

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत कणकवली तालुक्यातील सरस्वती विद्या मंदिर साकेडी शाळा नंबर 1 या शाळेने निकषास पात्र ठरत द्वितीय क्रमांक पटकावला. कलमठ बाजारपेठ शाळेने प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर हरकुळ खुर्द गावडेवाडी शाळेने तृतीय क्रमांक मिळवला. साकेडी शाळे कडून या अभियाना पूर्वीच विविध योजना, उपक्रम राबवत सुंदर शाळा ही संकल्पना राबवली होती. लोकसहभाग घेत मुख्यध्यापक समिधा वारंग व त्यांच्या शिक्षकांनी या शाळेत स्पर्धेत येण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. शाळा व्यवस्थापन समितीने अध्यक्ष विनोद जाधव यांच्या सहीत देखील या योजनेत पात्र ठरण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते. भविष्यात या योजनेअंतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी साकेडी शाळा नंबर 1 चा प्रयत्न असल्याची माहिती मुख्याध्यापक समिधा वारंग व शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून देण्यात आली.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!